मुळशीतील शासकीय कार्यालयांत लावला नागरी सनदेचा फलक

मुळशीतील शासकीय कार्यालयांत लावला नागरी सनदेचा फलक

पौड, ता. २२ : मुळशी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात नागरी सनद लावावी, या युवासेनेच्या मागणीची दखल महसूल खात्याने घेतली. युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अविनाश बलकवडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रत्येक कार्यालयात आता नागरी सनद लावण्यात आली आहे.

तालुक्यात विविध सरकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नाही. एखाद्या कामाचा निपटारा किती दिवसात होतो याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. नागरी सनदेद्वारे ही माहिती ग्रामस्थांना मिळते. त्यामुळे ही सनद शासकीय कार्यालयात दर्शनी भागावर लावली जावी, अशी सरकारची अपेक्षा असते. तालुक्यातही ही सनद लावावी, अशी मागणी बलकवडे यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यावेळी शिवसहकार आघाडीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेशवर डफळ, संतोष तोंडे, राम गवारे, दिलीप गुरव, नामदेव टेमघरे, शिवाजी बलकवडे उपस्थित होते.
मुळशीतील सर्व शासकीय कार्यालयात नागरी सनद लावल्याने कामाचा मोठ्या प्रमाणावर निपटारा होऊन समाधन मिळेल. तथापि जर कुणाही नागरिकांचे शासकीय काम वेळेवर झाले नाही किंवा त्यात काही अडचणी आल्यास पौडच्या युवासेना कार्यालयात संपर्क करावा, असे युवासेना पश्चिम महाराष्ट्रचे सचिव अविनाश बलकवडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com