मुळशी तालुक्यात मुलींचीच आघाडी

मुळशी तालुक्यात मुलींचीच आघाडी

पौड, ता. २ : इयत्ता दहावीचा मुळशी तालुक्याचा एकूण निकाल ९५.९९ टक्के लागला. तालुक्यातील २६ शाळांचे निकाल शंभर टक्के लागले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच टक्केवारीत आघाडी घेतली. तथापि गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या निकालामध्ये एक टक्क्याने घसरण झाली असून, शंभर नंबरी शाळांची संख्याही सातने घटली आहे. प्रथमच परीक्षेला बसलेल्या २९९४ मुलांपैकी ७९४ मुले विशेष श्रेणीत, १३०० मुले प्रथम, ७२८ द्वितीय आणि १७२ मुले तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाच्या माले येथील सेनापती बापट विद्यालय, वांद्र्याचे बाबूराव ढमाले विद्यालय या दोन्ही शाखांचे निकाल शंभर टक्के लागले. तसेच, मामासाहेब मोहोळ विद्यालय मुठा, मामासाहेब मोहोळ विद्यालय शेरे, विद्या विकास मंदिर आंदगाव, मुळशी धरण प्रशाला पोमगाव, माध्यमिक विद्यालय कुळे, माध्यमिक विद्यालय काशिग, श्री विंझाईदेवी हायस्कूल ताम्हिणी, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारआंबोली, न्यू इंग्लिश स्कूल माण, माध्यमिक विद्यालय कोळावडे, अमृतेश्वर विद्यालय कोंढूर, पिरंगुटचे विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, शार्दूल एस. जाधवर विद्यालय बावधन, धनीराज माध्यमिक विद्यालय वाकड, रामचंद्र शितोळे इंग्लिश मीडियम स्कूल मारूंजी, द जिनीयस इंग्लिश मीडियम स्कूल, द न्यू डेल इंग्लिश मीडियम स्कूल, दासवे पब्लिक स्कूल, सुदर्शन विद्या मंदिर, मामासाहेब मोहोळ मेमोरीयल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे या शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, पिरंगुट आणि सूस या तिन्ही शाखांतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील इतर शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे- पिरंगुट इंग्लिश स्कल पिरंगुट (९६.९४), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड (९८.९४), न्यू इंग्लिश स्कूल घोटवडे (९७.५२), न्यू इंग्लिश स्कूल कोळवण (९८.४१), भैरवनाथ विद्यालय रिहे (९६.७२), न्यू इंग्लिश स्कूल हिंजवडी (९५.४५), माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे (९७.४०), नरसिंह विद्यालय ताथवडे (९६.५५), नामदेवराव मोहोळ विद्यालय खांबोली (९७.०५), चेतन दत्ताजी विद्यालय बावधन खुर्द (९८.००), महात्मा फुले विद्यालय लवळे (९७.१८), अप्पासाहेब ढमाले विद्यालय खेचरे (९६.१५), कै.बाबूराव रायरीकर विद्यालय उरवडे (९८.४८), पीसीएमसीज माध्यमिक विद्यालय थेरगाव (८६.०९), तुकाई माध्यमिक विद्यालय नेरे (९१.४२), माध्यमिक विद्यालय भूगाव (९८.९३), न्यू इंग्लिश स्कूल मारूंजी (९७.२६), पीसीएमसीज माध्यमिक विद्यालय वाकड (७८.८४), स्वामी विवेकानंद विद्यालय असदे (८८.४६), संपर्क ग्रामीण विद्याविकास मंदिर भांबर्डे (९७.२९), कै. सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे (८६.६६), न्यू इंग्लिश स्कूल, सूसगाव (९९.६६), श्रीमती अनुसया ओव्हाळ माध्यमिक विद्यालय पुनावळे (८८.३७), सेंट्रल माध्यमिक निवासी शाळा पुणे (५०).


मुळशी तालुक्याचा निकाल दृष्टीक्षेपात
- एकूण माध्यमिक शाळा- ५४
- परीक्षा दिलेली मुले- १६२९
- परीक्षा दिलेल्या मुली- १४९०
- परीक्षा दिलेले एकूण विद्यार्थी- ३११९
- उत्तीर्ण मुले- १५४१ (९४.५९ टक्के)
- उत्तीर्ण मुली- १४५३ (९७.५१ टक्के)
- एकूण उत्तीर्ण- २९९४ (९५.९९ टक्के)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com