नांदूरमध्ये आता अर्धनग्न उपोषण

नांदूरमध्ये आता अर्धनग्न उपोषण

Published on

राहू, ता. ६ : दौंड तालुक्यातील नांदूर आणि सहजपूर परिसरातील कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार नाही. मोठ्या प्रमाणात हवा व जलप्रदूषण होत आहे. दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक बनल्या आहेत. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आदी प्रश्न सुटण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. शनिवारपासून अर्धनग्न स्वरूपाचे उपोषण सुरू केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा सरचिटणीस नामदेव ताकवणे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, कंपनी प्रशासनाला गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असे उपोषणकर्ते उमेश म्हेत्रे, योगेश बोराटे यांनी सांगितले. यावेळी दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष सचिन काळभोर, स्वरांश ग्रुपचे सागर तावरे आदी उपस्थित होते.
फिल्टगार्ड फिल्टर्स कंपनीकडून ८५ टक्के स्थानिकांना रोजगार दिल्याचा लेखी खुलासा केला आहे. याबाबत नामदेव ताकवणे म्हणाले, ‘‘जर स्थानिकांना ८५ टक्के रोजगार दिला असेल, तर स्थानिक रोजगारांच्या नावांची यादी कंपनी प्रवेशद्वार लावावी. त्याचक्षणी आम्ही उपोषण मागे घेऊ. गावातील आजी-माजी पदाधिकारी वैयक्तिक स्वार्थापोटी उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.