खेड तालुक्यात संप यशस्वी 
खेड तालुक्यात संप यशस्वी

खेड तालुक्यात संप यशस्वी खेड तालुक्यात संप यशस्वी

राजगुरूनगर, ता. ४ : वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात महावितरणचे खेड तालुक्यातील १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले आणि संप यशस्वी केला. मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीजपुरवठ्यात आज (ता.४) दिवसभर तरी कुठलाही व्यत्यय आला नाही. महावितरणच्या कथित खासगीकरणाविरुद्ध वीज कर्मचारी संघटनांनी संप पुकारला होता. तांत्रिकी युनियन ५०५९, वर्क फेडरेशन, एसी ए, कामगार महासंघ, तांत्रिक युनियन, मागासवर्गीय संघटना इत्यादी ३० संघटनांनी या संपात भाग घेतल्यामुळे संप यशस्वी झाला. संपाला पाठिंबा देण्यासाठी राजगुरुनगर विभागातर्फे मोर्चाची सभा चांडोली येथील कार्यालयासमोर, सकाळी दहा वाजता पार पडली. त्यामध्ये सचिन कळढोणे, रंगनाथ गोरडे, विक्रांत ओव्हाळ, ज्ञानेश्वर बोरचाटे, अजित दसगुडे, राजेंद्र बिचकर, सुखदेव मालपोटे, दीपक तनपुरे, राहुल पालखे आदींनी मते मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com