साहेबराव बुट्टेपाटील महाविद्यालयाचे
सांडभोरवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर

साहेबराव बुट्टेपाटील महाविद्यालयाचे सांडभोरवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर

राजगुरुनगर, ता. १८ : साहेबराव बुट्टेपाटील महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सांडभोरवाडी (ता. खेड) येथे विविध उपक्रमांद्वारे नुकतेच उत्साहात पार पडले. ''युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास'', अशी शिबिराची संकल्पना होती.

शिबिराच्या उद्घाटनास खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, विजय वाडेकर, सुरेश टाकळकर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, सांडभोरवाडीचे सरपंच अरुण थिगळे, उपसरपंच संतोषी ढोरे, माजी सरपंच कविता पाचारणे, राजगुरुनगर बँकेच्या संचालिका अश्विनी पाचारणे, भांबुरवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे, अरविंद दौंडकर, संतोष पाचारणे, रामदास सांडभोर, महेश सांडभोर, प्रा. बी. बी. आरुडे, रामदास पाचारणे, अरुण सांडभोर, सीमा आरुडे आदी उपस्थित होते.

शिबिरात स्वयंसेवकांनी गावातील सार्वजनिक स्वच्छता, लिंगभाव संवेदनशीलता, लोकशाहीतील सहभाग, जलस्रोत व वृक्षारोपण, प्रधानमंत्री जनधन व विमा योजना, अन्न सुरक्षा, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, पर्यावरण संवर्धन, महिला सबलीकरण, स्त्री-भ्रूणहत्या, ग्रामीण विकासात ग्रामसभेची भूमिका, आर्थिक स्वावलंबन, रस्ते सुरक्षा या विषयांवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले. टेंभीच्या डोंगरावरील दोन हजार वृक्षांना आळी करून त्यांत माती व खत टाकले. समारोपाच्या दिवशी आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरार्थींना गटविकास अधिकारी अजय जोशी, नामदेव सांडभोर, शिवव्याख्याते प्रा. संपत गारगोटे, डॉ. स्नेहा भोंडवे, कैलास मुसळे, पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान, साहित्यिक साईनाथ पाचारणे यांनी मार्गदर्शन केले.

शिबिराचा समारोप संस्थेचे संचालक हिरामण सातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी संचालक राजेंद्र टाकळकर, डॉ. श्रीकांत फुलसुंदर उपस्थित होते. या शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून साहिल गोरडे आणि सिद्धीका चोरघे यांना गौरविण्यात आले.

शिबिराचे आयोजनात प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. डॉ. शिल्पा जगताप, डॉ. उमेश भोकसे, अभिजित बेंडाले, तुषार वेहळे, श्वेताली देशमुख आदींनी सहभाग घेतला.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com