आलेगाव पागा येथे शिवजयंतीनिमित्त उपक्रम

आलेगाव पागा येथे शिवजयंतीनिमित्त उपक्रम

रांजणगाव सांडस, ता. २२ : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील भैरवनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (ता.२०) विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी केली. याप्रसंगी प्रतिमा पूजा, व्याख्यान, विद्यार्थी, शिक्षक मनोगत, शिवरायांची वेशभूषा आदि उपक्रम राबविले होते. यावेळी सचिव मनोहर भोसले यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले.

या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आरवडे, प्राचार्य तुकाराम बेनके, सुभाष भोसले, वैभव शिंदे, पांडुरंग वेताळ, दत्तात्रेय वाघचौरे, राजेंद्र गुळवे, संभाजी कुटे, संतोष शेळके, अंबादास गावडे, गोरक्ष डुबे, दिलीप वाळके, सतीश अवचिते, नवनाथ डुबे, ज्योती गजरे, सत्यश्री दिवटे व विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर, आभार नितीन गरुड यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com