शिरूर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

शिरूर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

रांजणगाव सांडस, ता. ९ : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी आदी गावात रविवारी (ता. ९) सायंकाळी अवकाळी पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली.

यामुळे गहू, कांदा, ज्वारी, द्राक्षे तसेच चारा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसाने चांगलीच शेतकऱ्याची धांदल उडवली. वीट भट्टी वाल्यांनी पावसाचा अंदाज येतात विटा प्लास्टिकच्या कागदाने झाकल्याने काहीचे नुकसान टळण्यास मदत झाली.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे हातात तोंडाशी आलेली पिके व चाऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात वीट भट्टीवर प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी कामगारांची धांदल उडाली होती. काढणीच्या स्थितीतील गव्हाच्या ओंब्या पडल्या तर वैरण भिजून काळी पडणार आहे तर शेतामध्ये काढलेला शेतातील काही जणांचा कांदा भिजला असल्याची माहिती आरणगाव येथील पोलिस पाटील संतोष लेडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com