इंदापूरसाठी अधिकाधिक निधी आणू : महारुद्र पाटील

इंदापूरसाठी अधिकाधिक निधी आणू : महारुद्र पाटील

इंदापूर, ता.२८ : ''''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने ''गाव तेथे शाखा'' उघडण्यात येत आहेत. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी पाठपुरावा करू,'''' अशी ग्वाही इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख महारुद्र पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुका शिवसेना पक्षाच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील युवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती बैठक तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केली होती. यावेळी तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटामध्ये युवा सेना पदाधिकारी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले. यावेळी युवा सेना कार्याध्यक्षपदी अलोक काळे, युवा सेना समन्वयक म्हणून मनोज वीर, भिगवन शेटफळगढे जिल्हा परिषद गट युवा उपतालुकाप्रमुख डॉ.अजित साळुंखे, कळस वालचंदनगर गट गजानन चौगुले, काटी वडापुरी गट गणेश खामकर, पळसदेव बिजवडी गट बाबासाहेब शिंदे, बावडा लाखेवाडी गट रूपचंद जाधव, निमगाव निमसाखर गट योगेश मिसाळ, पळसदेव पंचायत समिती गण शुभम राखुंडे, युवा सेना प्रसिद्धीप्रमुख नीलेश तावरे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रवक्ते वसंत आरडे, इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सूरज काळे, युवा सेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब काळे, शहर प्रमुख अशोक देवकर, तालुकाप्रमुख बबन खराडे यांचे हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला.
-
03380

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com