मोबाईल चोरणाऱ्या महिलेला
इंदापुरात महिलेनेच पकडले!

मोबाईल चोरणाऱ्या महिलेला इंदापुरात महिलेनेच पकडले!

इंदापूर, ता. ९ : इंदापूर शहरातील भाजी मंडईमध्ये भर सकाळी मोबाईल चोरणाऱ्या महिलेला नागरिकांच्या मदतीने एका महिलेनेच पकडले. मात्र, यावेळी चोर महिलेसोबत असलेले तिचे दोन साथीदार पळून गेले. पकडलेल्या महिलेकडून यापूर्वी इंदापूरमधून चोरी झालेल्या अनेक मोबाईलची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत रेशमा नौशाद शेख (वय ३४, रा. कसबा-इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी (ता. ८) सकाळी साडेनऊच्या सुमारास इंदापूर नगरपालिकेजवळील मंडईत भाजी घेत असताना त्यांच्या जवळ एक पिवळ्या रंगाची साडी घातलेली बाई उभा होती. त्यावेळी त्यांना पर्समध्ये ठेवलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन दिसून आला नाही. त्यामुळे मोबाईलचा शोध घेत असताना तेथे उभा असलेले धिरज मदनदास शहा (रा. मेनपेठ, इंदापूर) यांचाही शर्टचे खिशातील आप्पो कंपनीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे समजले. त्यावेळी भाजीपाला घेत असताना जवळ उभा असलेली बाई अचानक जोरात चालत निघून गेल्याचे जाणवले. त्यावेळी तिच्यासोबत दोन व्यक्तीही होत्या. तीला आवाज दिला असता ती थांबली नाही. त्यावेळी रेशमा व धिरज यांनी तिचा पाठलाग करून तिला थांबवले. मात्र, तिच्या सोबत असलेल्या दोन व्यक्ती पळून गेल्या. संशय आल्याने तिला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी नाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव शाहीदा महादेव तुपे (वय ४५, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापुर) असे सांगितले. त्यानंतर महिला पोलिस दिलशाद मुजावर यांनी तिची झडती घेतली असता रेशमा हिचा मोबाईल फोन मिळून आला. मात्र, धीरज यांचा मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे शाहीदा व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com