इंदापूर शहरात वाहतूक कोंडी

इंदापूर शहरात वाहतूक कोंडी

इंदापूर, ता. १२ : शहरातील वाहतूक शिस्तीला पायदळी तुडविले जात आहे. रस्त्याच्यामध्ये गाडी उभी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत असून, वाहन चालकांना कायद्याची भीती नसल्याचे दिसत आहे. याबाबत पोलिस प्रशासन, परिवहन विभाग व इंदापूर नगरपरिषद यांनी संयुक्तरीत्या नियोजन करण्याची गरज आहे.

इंदापूर शहरातून पुणे सोलापूर महामार्ग अवजड वाहनांना बाह्यवळण महामार्गाचा वापर करण्याच्या सूचना आहेत. पण दिवस-रात्र अनेक वाहने नियम मोडून इंदापूर शहरातून बेकायदेशीरपणे भरधाव वेगाने जातात. तसेच रस्त्यावर नियम मोडून करण्यात येत असलेली पार्किंग यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत आहेत.

याबाबत परिवहन विभाग व पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठेसह जुना पुणे सोलापूर महामार्गावर पार्किंगबाबत योग्य नियोजन करून जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे परिवहन पोलिस व नगरपालिका यांनी संयुक्तरित्या या प्रश्नाबाबत तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


शहरात धोक्याचा प्रवास
शहरातील पुणे सोलापूर महामार्गावर शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, बस स्थानक, पोलिस स्टेशन, आठवडे बाजार आणि अनेक शासकीय व खाजगी दवाखान्यांमुळे हजारो नागरिकांच्या विशेषतः: विद्यार्थ्यांची, वृद्धांची नेहमी वर्दळ असते. मात्र बेकायदेशीर व धोकादायक वेगाने जाणारी अवजड वाहने, नियम मोडून उभा केलेली वाहने, फुटपाथवर अतिक्रमणामुळे चालायला मिळत नसलेली जागा यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालण्याचा धोका पत्करावा लागत आहे.


डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आवश्यक
गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहरांमध्ये लग्न समारंभ, जयंती यामध्ये कर्कश आवाजाच्या डीजे सिस्टीममुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. अशावेळी पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाते.
मात्र कायद्यालाही मर्यादा असल्याने याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र सर्वसामान्य नागरिकाला याचा खूप त्रास सहन करावा लागतो.
-
सामाजिक जाणीव महत्त्वाची
कायदा मोडल्यास काय होतंय बघू, असं म्हणण्यापेक्षा सामाजिक जाणीव होणं आवश्यक आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत आपल्याला जसा हक्क आहे. तशीच आपली काही कर्तव्य ही आहेत ही बाब प्रत्येकाने विचारात घेत. नागरिकांनी नियम पाळल्यास पोलिस प्रशासन नगरपरिषद परिवहन विभाग यांच्यावरील कामाचा ताण कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com