‘सोमेश्‍वर’चे एमडी यादव यांची
‘को-जनरेशन’ संघटनेवर निवड

‘सोमेश्‍वर’चे एमडी यादव यांची ‘को-जनरेशन’ संघटनेवर निवड

सोमेश्वरनगर, ता. २२ : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांची ‘को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या कार्यकारिणीवर निवड झाली.
देशभरातील साखर कारखानदारीस सहवीजनिर्मिती प्रकल्पांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणे, नवनवे संशोधन करण्यास चालना देणे, सरकारशी संवाद करून समस्यांवर तोडगा काढणे, अशी कार्य सदर संस्थेमार्फत होत असतात. या संस्थेवरील साखर धंद्यातील तज्ज्ञ जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे, संजय खताळ अशा दिग्गजांसोबत यादव यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने साखर निर्यातीसंदर्भात इंडोनेशियाला पाठविलेल्या अभ्यास समितीत यादव यांना संधी मिळाली होती. छत्रपती, अकलूज, कृष्णा, रयत, सोमेश्वर अशा कारखान्यांचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.
या निवडीबद्दल संचालक मंडळाने अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांच्या हस्ते यादव यांचा सत्कार केला. तसेच, कामगार व अधिकाऱ्यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी राजवर्धन शिंदे, सुनील भगत, संग्राम सोरटे, बाळासाहेब जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. दत्ता माळशिकारे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com