काकडे महाविद्यालयास ''अ'' श्रेणी प्रदान

काकडे महाविद्यालयास ''अ'' श्रेणी प्रदान

सोमेश्वरनगर, ता. ७ : येथील मु. सा. काकडे महाविद्यालयास केंद्र सरकारची उच्चशिक्षण क्षेत्राचा दर्जा प्रदान करणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन प्रमाणिकरण परिषदेच्या (नॅक) बेंगलोरच्या समितीने भेट दिली. त्या समितीने महाविद्यालयास ''अ'' श्रेणी प्रदान केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अ दर्जा प्राप्त झाला आहे. मूल्यांकन पद्धतीत २०२२ ला बदल केल्यानंतरचा हा पहिला निकाल आहे.

महाविद्यालयास नॅक समितीने २००४ मध्ये B श्रेणी, २०१२ साली ''B+'' श्रेणी, २०१७ साली ''B++'' ही श्रेणी प्रदान केली. आता चौथ्या प्रयत्नात महाविद्यालयाने यशाची कमान चढती ठेवली. बेंगलोर, पश्चिम बंगाल, गोवा येथील त्रीसदस्यीय समितीने ३.२४ CGPA सह ''A'' श्रेणी बहाल केले आहे.
महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे म्हणाले, शैक्षणिक दर्जा वाढवून आणि सर्व भौतिक सुविधा उभारून आमची विद्यापीठ परिक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. खासदार व्ही. मुरलीधरन, राजेश पांडे, प्रमोद काकडे यांच्या मदतीने पायाभूत सुविधा उभारता आल्या. प्राध्यापक, शिक्षक यांच्या कष्टाने हे यश प्राप्त झाले.
प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले, महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए (सीए), एम.ए., एम.कॉम आणि एम.एस्सी. असे पारंपरिक अभ्यासक्रम आहेत. तसेच इतिहास, मराठी व वाणिज्य विषयातील तीन पीएच.डी. संशोधन केंद्रे चालवली जातात.

यामुळे मिळला ''अ'' दर्जा
-कौशल्याधिष्ठित १३ विविध शॉर्ट टर्म कोर्सेस
- वंचित, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
- माजी विद्यार्थी आर.एन. शिंदे यांनी दोन कोटींचे अद्ययावत सभागृह दिले
- प्रशस्त मैदान, ओपन जिम यामुळे खेळात अग्रेसर
- अध्यापन, अध्ययन व मूल्यमापन,
- तीन संशोधन केंद्र व संशोधनात भरीव कार्य
- विद्यार्थी सक्षमीकरण व वृद्धीकरण
- प्रशासन व नेतृत्व
- सामाजिक बांधिलकीतून असंख्य उपक्रम
----
02570

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com