
शेटफळगढे येथे महिलादिन उत्साहात
शेटफळगढे, ता. ९ : श्री नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, किरण बेदी, पी. टी. उषा, पी. व्ही. सिंधू, सानिया मिर्झा, आनंदीबाई जोशी यांची वेशभूषा केलेल्या मुलींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलींचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.
सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी श्रुती अशोक धुमाळ व श्रेया बापूराव झगडे यांनी केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी सिरसट व इतर सर्व शिक्षकांनी महिलादिनाचे स्वागत गीत गायिले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सिरसट, उपाध्यक्ष बाळासाहेब सावंत, मैना पवार, चंद्रकांत मचाले उपस्थित होते.