शिरूर नगर पालिका शाखाध्यक्षपदी जाधव

शिरूर नगर पालिका शाखाध्यक्षपदी जाधव

शिरूर, ता. ३ : अखिल शिक्षक संघाच्या शिरूर नगर पालिका शाखाध्यक्षपदी धनंजय जाधव; तर सरचिटणीसपदी ललिता साकोरे यांची निवड करण्यात आली.
अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके व राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या सभेत अखिल शिक्षक संघाच्या नगर पालिका शाखेची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांबरोबरच; कृषी पर्यवेक्षक परिक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल अरुण जोरी, शिरूर शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शर्मिला अर्जुन निचित; तसेच सेवानिवृत्तीनिमित्त संजय दिवटे व केशव खंडागळे या शिक्षकांचाही संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पठारे, माजी अध्यक्ष अर्जुन निचित व रमेश थोरात, सरचिटणीस गणेश पवार, शिक्षक नेते रामदास उगले व रावसाहेब पवार, कार्याध्यक्ष विठ्ठल दुडे, वैशाली ठिकेकर सरला फुंदे, नवनाथ निचित, शीतल जोरी, अरुण खोमणे आदी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : धनंजय जाधव, सरचिटणीस : ललिता साकोरे, कार्याध्यक्ष : संपदा राठोड, सहकार्याध्यक्ष : सुजाता भोसले, कोषाध्यक्ष : नंदा वेताळ, उपाध्यक्ष : मीरा थोरात व बाळासाहेब निर्वल, तालुका समन्वयक : अनिता धुमाळ, सहचिणीस : हुमेरा सय्यद.

02349, 02348

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com