शिरूरमध्ये आजपासून ‘शासन आपल्या दारी’

शिरूरमध्ये आजपासून
‘शासन आपल्या दारी’

शिरूर, ता. २२ : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतिमानपद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी शिरूर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत उद्यापासून (ता. २३) सर्व मंडल स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिरूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे - देवकाते यांनी दिली.
शासकीय योजनांशी निगडित संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन नागरिकांना योजनांचा लाभ देणार आहेत. न्हावरे मंडल अंतर्गत न्हावरेच्या तलाठी कार्यालय येथे आणि मंडल अधिकारी कार्यालय वडगाव रासाई येथे मंगळवारी (ता. २३), शिरूर व रांजणगाव गणपती मंडलअंतर्गत जुनी नगरपालिका सभागृह शिरूर येथे बुधवारी (ता. २४), तळेगाव ढमढेरे व कोरेगाव भीमा मंडलअंतर्गत गौरी नंदन मंगल कार्यालय, कोरेगाव भीमा येथे शुक्रवारी (ता. २६), पाबळ व मलठण मंडलअंतर्गत भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ येथे २९ मे रोजी आणि टाकळी हाजी मंडलअंतर्गत बापूसाहेब गावडे विद्यालयाच्या शेजारील पोलिस स्थानकाजवळील टाकळी हाजीचे मागील सभागृह येथे येथे ३१ मे रोजी अभियानाचे आयेाजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com