शिरूरमध्ये अडीच लाख मतदारांनी बजावला हक्क

शिरूरमध्ये अडीच लाख मतदारांनी बजावला हक्क
Published on

शिरूर, ता. ८ : तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांमध्ये शनिवारी (ता.७) शांततेत ७५.९६ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख एक हजार ७८६ पैकी २ लाख २९ हजार २३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात गटांसाठी एकूण २० तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. शनिवारच्या मतदानानंतर त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. तालुक्याच्या सर्वच भागांत उत्साहात मतदान झाले. गट व गणांच्या मतदानासाठी तालुक्याच्या विविध भागांत ३७१ मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. एकूण एक लाख ५३ हजार ३३९ पुरुष मतदारांपैकी एक लाख १९ हजार ५८६ तर एकूण एक लाख ४८ हजार ४३४ महिला मतदारांपैकी १ लाख नऊ हजार ६४१ मतदारांनी या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. तेव्हा तुलनेने मतदानाचा वेग कमी होता. सुरवातीच्या दोन तासांत म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी ७.२१ टक्के मतदान झाले होते. साडेअकरा वाजेपर्यंत २१.३७ टक्के, दुपारी दीड पर्यंत ३८.४८, साडेतीन वाजता ५५.१९ टक्के मतदान झाले. त्यावेळपर्यंत ८५ हजार ९०५ पुरुष व ८० हजार ६४६ महिलांनी मतदान केले होते. शेवटच्या दोन तासांत मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्याने अनेक मतदान केंद्रांवर मतदारांचा ओघ दिसून आला. शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाल्याने साडेपाचच्या सुमारास अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

सर्वाधिक आणि सर्वांत कमी मतदान
रांजणगाव गणपती - कारेगाव या जिल्हा परिषद गटासाठी सर्वाधिक ८०.८१ टक्के तर शिक्रापूर - सणसवाडी गटासाठी सर्वात कमी ७१.१८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली.

रांजणगाव येथील गोदामात आज मतमोजणी
शनिवारी झालेल्या मतदानानंतर जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या १४ जागांसाठीची मतमोजणी, सोमवारी (ता. ९) रांजणगाव एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात केली जाणार आहे. दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार असून, गट व संबंधित गणनिहाय मतमोजणी होणार आहे.

गणनिहाय आकडेवारी

गण***झालेले मतदान***टक्केवारी
कवठे येमाई ***१६७८८***७६.४४
टाकळी हाजी *** १६७३३*** ८०.७३
शिरूर ग्रामीण ***१७१०७ ***७२.६९
न्हावरा *** १४७८१ ***७५.०१
रांजणगाव गणपती ***१६८७०*** ८१.३७
कारेगाव ***१६३६३ ***८०.२५
पाबळ *** १६९६२ ***७२.८३
केंदूर *** १७९५७*** ७६.९७
शिक्रापूर *** १४९५०*** ७०.६६
सणसवाडी *** १४०४५ *** ७१.७०
तळेगाव ढमढेरे *** १७४७५ *** ७५.७१
रांजणगाव सांडस ***१६९०३ ***८२.०७
वडगाव रासाई ***१६८७२ ***७५.८२
मांडवगण फराटा *** १५४२७ ***७१.९७


गटनिहाय आकडेवारी

गट *** झालेले मतदान*** टक्केवारी

कवठे यमाई- टाकळी हाजी***३३५२१ ***७८.५८
न्हावरे- शिरूर *** ३१८८८ ***७३.८५
रांजणगाव गणपती- कारेगाव***३३२३३ *** ८०.८१
पाबळ- केंदूर***३४९१९*** ७४.९०
शिक्रापूर- सणसवाडी ***२८९९५ *** ७१.१८
तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस*** ३४३७८ *** ७८.८९
मांडवगण फराटा- वडगाव रासाई *** ३२२९९ *** ७३.८९
एकूण मतदान ***२,२९,२३३
टक्केवारी **** ७५.९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com