सासवड शहर परिसरात
अतिक्रमणांवर हातोडा

सासवड शहर परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

सासवड, ता. १० : येथील सार्वजनिक रस्ते, चौक, विनापरवाना टपऱ्या, वाहतुकीस अडथळा आणणारे शेड, ओटे, पायऱ्या, गटारे, नाले यावरील अतिक्रमणे काढण्यास नगरपालिकेने मंगळवारपासून सुरवात केली. त्यामध्ये पहिला दणका जेजुरी नाका, शहरातील जेजुरी मार्ग, पारगाव मार्ग, बाबू लोहार आदी परीसरातील अतिक्रमणे काढून दिला. येथून पुढे चार ते पाच दिवस ही अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरु राहील, असे नगरपालिकेने जाहीर केले.
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले की, अतिक्रमणे काढण्याचे आवाहन करून तत्पूर्वी संबंधितांना नोटीसही बजावल्या होत्या. त्यानुसार पहिल्या दिवशी हातोडा फिरला व जेजुरी नाका, शहरातील जेजुरी मार्ग, पारगाव मार्ग, बाबू लोहार आदी परीसरातील अतिक्रमणे काढली.
अतिक्रमण कारवाईत अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनंत भोईटे, उप विभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, नगरपालिकेचे नगररचनाकार सुमीत काशीद, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, अभियंता धोंडिराम भगनुरे, रामानंद कळसकर, कार्यालयीन अधीक्षक संदेश मांगडे, कर निरीक्षक उत्तम सुतार, प्रमोद भोंडे, राम कारंडे आणि इतर पालिकेचे, वीज वितरण कंपनीचे, पोलिस यंत्रणेचे कर्मचारी, पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सेवक यांनी सहभाग घेतला
कोणत्याही भागात सार्वजनिक जागा, चौक, पदपथ यावरील अतिक्रमणे सुजाण नागरीकांनी पालिकेला कळविल्यास त्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यासाठी सुजाण नागरीकांनी लेखी तक्रारी नगरपालिकेत कराव्यात, असे आवाहन पालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com