उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सासवडला ठिय्या आंदोलन स्थगित

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सासवडला ठिय्या आंदोलन स्थगित

सासवड, ता.१५ : येथील (ता. पुरंदर) विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. १४) ठिय्या आंदोलन केले होते. मात्र महावितरणने कृषी पंपांचे वीज जोड पूर्ववत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ते स्थगित करण्यात आले.
तालुक्यात वीज बिल वसुलीसाठी बहुतांश ठिकाणी कृषी पंपांच्या रोहित्राची वीज बंद केली आहे. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची पाण्याअभावी पिके सुकू लागली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितणचे कार्यकारी अधिकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना वीजप्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी वनमोरे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी बोलून लवकरच कृषी पंपाच्या वीज जोडण्या पूर्ववत करू, असे आश्‍वासन दिले. मात्र, कृषी पंपांची वीज पूर्ववत केली नाही तर पुन्हा ठिय्या करू, असा इशारा पुरंदर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अभिजित जगताप दिला.

निवेदन देताना उपतालुका प्रमुख राजेश क्षीरसागर, राहुल यादव, शांताराम जगदाळे, राजेंद्र कुदळे, गणेश वाघ, समन्वयक संतोष भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक संजय चाचर, गुलाबभाई सय्यद, राजाभाऊ खेनट, सुनील काकडे, कैलास कटके, हरीश दुबळे, शहर प्रमुख राजेंद्र जगताप, कुणाल जगताप, सागर बागडे, मंगेशअप्पा जगताप, योगेश गायकवाड, संतोष भोंगळे, बजरंग चाचर, राहुल होले, शैलेश भोसले, सुकल हेमंत, अरुणा हरपळे, प्रियांका सुकल, बसंती श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com