सासवड येथील अपघातात 
दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

सासवड येथील अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

सासवड, ता. २ : नारायणपूरकडून सासवडकडे दुचाकीवर येत असलेल्या दोघांना विरुद्ध बाजूने आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाची धडक बसली. या अपघातात दुचाकीचालक व त्याच्या मागे बसलेल्या ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला. बाळासाहेब शिवाजी पोमण (वय ४०) व भीमराव लक्ष्मण कांबळे (वय ६५, दोघेही रा. पोखर, ता. पुरंदर), अशी त्यांची नावे आहेत.
या अपघातास कारणीभूत ठरलेला इरटीका मोटारीवरील चालक वरद विकास खंडागळे (वय २०, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्या विरुद्ध कृष्णा चंद्रकांत पोमण (वय २३, रा. पोखर) यांनी तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल आहे. हा अपघात फिर्यादी कृष्णा पोमण यांनी पाहिला. शुक्रवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास शेटेमळा-सासवड (ता. पुरंदर) येथे नारायणपूर ते सासवड मार्गावर झेलेआण्णा हॉटेलजवळ हा अपघात झाला. स्प्लेंडर मोटारसायकलवरून (क्र. एम.एच.१२ बी.आर.९९६८) बाळासाहेब पोमण व भीमराव कांबळे हे सासवडकडे येत होते. त्यावेळी सासवडकडून नारायणपूरकडे निघालेली इरटीका मोटारीवरील (क्र. एम.एच.१३ डी.ई.५४६८) चालक वरद खंडागळे याने स्वतःची लेन सोडून विरुद्ध लेनमध्ये घुसला. वेगात मोटारीची या दुचाकीस्वारांना जबरदस्त धडस बसली. त्यात दुचाकीवरील दोघे फेकले जाऊन डांबरी रस्त्यावर पडले. त्यात त्यांना गंभीर जखम झाली. जमलेल्यांनी शासकीय रुग्णवाहिका ‘१०८’ला संपर्क केला. त्यातील डॉक्टरांनी तपासणी केली व दोघे मृत झाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com