बिबट्याकडून दोन शेळ्या तळेगाव ढमढेरे येथे फस्त

बिबट्याकडून दोन शेळ्या तळेगाव ढमढेरे येथे फस्त

तळेगाव ढमढेरे, ता.२५: येथील (ता. शिरूर) गणेशमळा येथे बिबट्याने राहुल रवींद्र ढमढेरे यांच्या मुक्त गोठ्यातील दोन शेळ्या फस्त केल्या केल्या. तर एका शेळीस जखमी केले. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. मृत शेळ्या बिबट्याला गोठ्याच्या बाहेर नेता आल्या नाहीत. त्यामुळे त्याने तेथेच अर्धवट अवस्थेत खाऊन टाकल्या.
ठार केलेल्या शेळ्यांचा व जखमी शेळीचा वनविभागाने पंचनामा केला आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस हवालदार किशोर तेलंग व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, दिलीप ढमढेरे, अनिल ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, ॲड.संपत ढमढेरे, गणेश ढमढेरे तसेच गणेश मळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com