तळेगावात आजपासून भैरवनाथाचा उत्सव

तळेगावात आजपासून भैरवनाथाचा उत्सव

तळेगाव ढमढेरे, ता.१२: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ देवाचा उत्सव गुरुवारपासून (ता.१३) सुरू होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व श्री भैरवनाथ उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किसनभाऊ भुजबळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उत्सवाचे हे ७१ वे वर्ष आहे.

उत्सवानिमित्त नवीन मंदिरात गुरुवारी पहाटे स्त्रीची महापूजा व अभिषेक होणार आहे. सकाळी हरिनामाच्या गजरात स्त्रीच्या छबिन्याची गावातून मिरवणूक निघणार आहे. उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले आहे. बैलगाडा शर्यतीतील बैलगाडा मालकांना भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. रात्री विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
शुक्रवारी ( ता.१४) दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. रात्री वसंत नांदवळकरसह रवींद्र पिंगळे यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ उत्सव मंडळाने दिली आहे.

04551

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com