तळेगावात ९०० शेळी, बोकडांची उपबाजारामध्ये खरेदी-विक्री

तळेगावात ९०० शेळी, बोकडांची उपबाजारामध्ये खरेदी-विक्री

तळेगाव ढमढेरे, ता.१५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.१५) सुमारे ९०० शेळी, बोकड व मेंढ्यांची खरेदी- विक्री झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सहसचिव अनिल ढमढेरे यांनी दिली.
येथील बाजारात शेळी आणि बोकडाला ७ ते १५ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. तसेच मेंढीला ३ ते ७ हजार रुपये भाव मिळाला आहे. येथील बाजारात पुणे, नगर, सातारा, इंदापूर, सोलापूर, मावळ आदी ठिकाणचे व्यापारी आले होते.
सध्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रशासक शंकर कुंभार, सचिव अनिल ढोकले, सहसचिव अनिल ढमढेरे व कर्मचारी वर्ग हे पाहत असून आजच्या बाजारात सहसचिव अनिल ढमढेरे, दादाभाऊ नरके, सूरज शेलार, महेश सातपुते, अतुल पिंगळे, गणेश पंडित, वैष्णव मेटे यांनी संयोजन केले. येथील बाजारात शिरूर, दौंड, हवेली, आंबेगाव आदी ठिकाणाहून शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी शेळी -मेंढी विक्रीसाठी आणली होती.

04656

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com