तळेगावात बिबट्याकडून तीन शेळ्या ठार

तळेगावात बिबट्याकडून तीन शेळ्या ठार

तळेगाव ढमढेरे, ता.२५: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) कवठीचा मळा येथील नवनाथ गजानन उकले यांच्या दोन शेळ्या तर संदीप बाळासाहेब ढमढेरे यांची एक शेळी बिबट्याने हल्ला करून ठार केली. ही घटना बुधवारी (ता.२४) रात्री घडली आहे.

तळेगाव ढमढेरे परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरणात आहे. परिसरात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे. पाळीव प्राणी, शेळी, मेंढी व कुत्र्यांवर बिबट्या हल्ला करीत आहे. दरम्यान, दररोज कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. गेल्या रविवारी तळेगाव ढमढेरे येथे बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आला, त्यानंतरही बिबट्याची दहशत परिसरात कायम आहे. परिसराची पाहणी करून विविध ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वारंवार वनविभागाकडे नागरिकांनी केली आहे, परंतु अद्याप वनविभागाचे बिबट्याच्या बाबतीत व पिंजरा लावण्याच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे नागरिक बोलत आहेत.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दररोज फिरून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. परिसरात बिबट्याची दहशत मात्र कायम असल्याची जाणीव येथील नागरिकांना झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com