‘विद्या विकास’मध्ये दोन गृहिणी
प्रदीर्घ खंडानंतर परीक्षेत यशस्वी

‘विद्या विकास’मध्ये दोन गृहिणी प्रदीर्घ खंडानंतर परीक्षेत यशस्वी

तळेगाव ढमढेरे, ता. २६ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील कला शाखेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून, यामध्ये दोन गृहिणी दहावीनंतरच्या मोठ्या गॅपनंतर बारावीची परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी यशस्वी झाल्या आहेत.

विद्यालयातील पद्मा रामदास भूमकर ही गृहिणी असलेल्या विद्यार्थिनी कला शाखेत ७४.१७ टक्के गुण मिळवून विद्यालयात चमकली. तसेच अतिशय कष्ट व मेहनत घेऊन विशाल बुवाजी डफळ या विद्यार्थ्याने ६९ टक्के गुण मिळविले आहेत. तर कांचन किसन विटकर या गृहिणी असलेल्या विद्यार्थिनीने ६१.३३ टक्के गुण मिळवले आहेत.

पद्मा भूमकर हिने २०१० मध्ये दहावीची परीक्षा देऊन ७२ टक्के गुण मिळविले होते. लग्न झाल्यानंतर शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत पद्माच्या मनात होती. कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केल्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर सन २०२३ मध्ये बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून राहिलेले शिक्षण पूर्ण केले. रांजणगाव गणपती येथे ग्राफिक डिझायनर म्हणून पद्मा कार्यरत आहे. व्यवसाय व कुटुंब सांभाळून रांजणगाव गणपती येथून निमगाव म्हाळुंगीच्या विद्यालयात कला शाखेत बऱ्याच काळानंतर ११ वी, १२ वीचे शिक्षण घेतले. सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केल्यानेच परीक्षेत जोमाने अभ्यास करून यशस्वी झाले असून, आगामी काळात पदवीचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचे पद्माने सांगितले.

तसेच विद्यालयातील कांचन विटकर या विद्यार्थिनीने दहावीनंतर १५ वर्षांच्या प्रदीर्घ गॅप घेऊन बारावीची परीक्षा दिली. यामध्ये तिने ६१.३३ टक्के गुण मिळवून अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची मिळालेली संधी पूर्ण केली आहे. कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केल्यामुळे तसेच सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच मी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झाल्याचे कांचनने सांगितले.

विद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रिकल विभागाचा ९२ टक्के आणि हॉर्टिकल्चर विभागाचा ८६ टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, ग्रामस्थ व प्राचार्य संजीव मांढरे यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

पद्मा भूमकर, कांचन विटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com