कत्तलीसाठी चालविलेल्या
११ बैल, १ गाईची सुटका

कत्तलीसाठी चालविलेल्या ११ बैल, १ गाईची सुटका

ओतूर, ता. १५ : कत्तलीसाठी चालविलेले अकरा बैल व एक जर्सी गाय, यांची ओतूर (ता. जुन्नर) पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी निसार गुलाब खान (वय ५०), फईम सादिक कुरेशी (वय २४, दोघे रा. कल्याण, जि. ठाणे) या दोघांना ताब्यात घेतले असून, बेल्हे येथील वसीम नावाचा व्यक्तीविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी माहिती दिली की, बेल्हे येथून नगर-कल्याण महामार्गावरून एक टेंपो (क्र. एम.एच. ०४ एच.डी. ३९८४) कल्याणच्या दिशेने पाळीव जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी डुंबरवाडी टोलनाक्यावर नाकाबंदी करून टेंपोची तपासणी केली असता त्यात ११ बैल व एक जर्सी गाय, अशी एकूण १२ जनावरे निर्दयपणे दाटीवाटीने कोंबून, चारा पाण्याची व्यवस्था न करता कल्याण येथे कत्तलीसाठी घेऊन चालल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी टेंपोतील पाळीव जनावरे ताब्यात घेऊन त्यांना मोशी येथील गो शाळेत सुरक्षित दाखल केले.
ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक कांडगे, पोलिस हवालदार महेश पटारे, नरेंद्र गोऱ्हाने, सुरेश गेंगजे, बाळशीराम भवारी, जनार्दन सापटे, दत्ता तळपाडे, देविदास खेडकर, नामदेव बांबळे, राजेंद्र बनकर, जोतिराम पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com