ओतूरमध्ये गाडगे बाबांच्या भजनाने परिसर दुमदुमला

ओतूरमध्ये गाडगे बाबांच्या भजनाने परिसर दुमदुमला

ओतूर,ता.२४: येथील (ता.जुन्नर) गाडगे महाराज शिक्षण संकुलात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली, अशी माहिती शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नितीन पाटील यांनी दिली.
गाडगे बाबांच्या मंदिरात प्रतिमा पूजन करून बाबांची महाआरतीने घेऊन ''गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला'' हे भजन पार पडले. यावेळी शाळेचा परिसर दुमदुमून गेलस. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर तर प्रमुख उपस्थितीत जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, सर्जेराव महाराज गाढवे उपस्थित होते.

माध्यमिक आश्रम शाळेतील मुलींनी गाडगे बाबांवर सुंदर गीत सादर केले. गाडगे बाबांचे मंदिर सुशोभित करण्यासाठी संकुलातील सर्वांनीच परीश्रम घेतले .तसेच विद्यार्थांनी मधुर आवाजात बाबांचे आवडते भजन म्हणून शालेय परिसर दुमदुमून टाकला.
कार्यक्रमात तन्वी ठिकेकर, वैभवी आहेर, साईराज पोकळे, भावेश पाटील, अथर्व दिघे, अपूर्व ठिकेकर, विराज बरबडे यांनी व इतर विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांच्या कार्याची महती विशद केली.
दरम्यान, साईराज मवाळ याने केलेली गाडगे बाबा यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. मंगेश देवरे, सचिन कांडगे यांनी संत गाडगे बाबां यांच्या कार्यची महती पटवून दिली. अध्यक्ष संतोष ठिकेकर यांनी गाडगे बाबांचे कार्याची महती विषद करत त्यांनी ठिकेकरवाडी गावचा काया पालट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात बाबत माहिती दिली. कोणत्याही चांगल्या कार्याला प्रथम विरोधच होतो पण आपण डगमगून जायचं नाही, असा मौलिक संदेश यांनी विद्यार्थ्यांनी दिला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अरुण वाकचौरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज कोटकर, पर्यवेक्षक कैलास महाजन, प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन घाडगे, ज्येष्ठ शिक्षक सुनील पोकळे, रामदास बगाड, प्रदीप कुमार, वरिष्ठ लिपिक राजकुमार मिरगे, अनिल भोसले, महेश पंधरे, शोभा तांबे उपस्थित होते.
इंग्रजी विभाग प्रमुख अशोक सोनोने यांनी सूत्रसंचालन तर सुनील पोकळे यांनी आभार केले.


03831

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com