कांदा, बटाट्याचे बाजारभाव कोसळले

कांदा, बटाट्याचे बाजारभाव कोसळले

ओतूर, ता.२३ : ओतूर (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार कांद्याचे व बटाट्याचे सरासरी बाजारभाव कोसळले. यामुळे कांदा व बटाटा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आहेत. या निच्चांकी बाजारभावामुळे उत्पादन खर्च ही हाती मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या कांद्याला सरासरी किलोला सहा ते आठ रुपये तर बटाट्याला किलोला दहा ते बारा रुपये सरासरी बाजारभाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च ही निघत नाही मात्र या हंगामातील येत असलेला अगाप (लाल) कांदा हा नाशवंत असल्याने साठवणूक करून, ठेवता येत नाही. त्यामुळे कांदाउत्पादक शेतकरी तोट्यात हा कांदा बाजारात विक्री करताना दिसून येत आहे. तसेच बटाटा ही नाशवंत असल्याने मिळेल, त्या भावात शेतकरी विक्री करीत आहे.

ओतूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात गुरुवारी १२,९३३ नवीन लाल कांदा पिशवीची आवक झाली आहे. त्यास प्रतवारीनुसार प्रती दहा किलोला गोळे कांदा १०० ते १२५, सुपर कांदा ७० ते ११०, गोल्टी कांदा ३० ते ७० तर बदला कांदा २० ते ६० असे बाजारभाव मिळाले आहे तर बटाट्याची २३२ पिशवी आवक झाली. त्यास प्रतवारी नुसार दहा किलोला ४० ते १७० रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील बाजाराच्या तुलनेत गुरुवारी ३०११ कांदा पिशवी आवक वाढली आहे. तसेच बटाट्याच्या आवकीत अंदाजे एकशे तीस पिशवीची घट झाली आहे. मात्र, कांद्याच्या बाजारभाव घसरण झाली तर बटाट्याचे बाजारभाव सरासरी स्थिर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com