पालखी विसाव्यास न 
थांबल्यास आंदोलनावर ठाम

पालखी विसाव्यास न थांबल्यास आंदोलनावर ठाम

उरुळी कांचन, ता. २० : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांना निवेदन देऊन नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरातच घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संत तुकाराम महाराज पालखी ही पूर्व हवेलीतील लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामास असते. त्यानंतर पुढे उरुळी कांचन येथे दुपारी विसाव्यास येते. मात्र, यंदा उरुळी कांचन येथे पालखी विसाव्यास थांबणार नसल्याचे हवेलीचे प्रांत अधिकारी आणि सोहळा प्रमुखांनी जाहीर केले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळाप्रमुखांनी १०जून ते २८ जून या दरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये उरुळी कांचनचा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे- सोलापूर महामार्गावरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल, असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील वैष्णवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संत तुकाराम महाराज संस्थानचे सोहळा प्रमुख यांनी पालखी सोहळा गावातून मंदिर मार्गी जाईल. परंतु, विसाव्यासाठी थांबणार नाही, असे सांगितले. त्यामुळे या निर्णयाचा तीव्र निषेध करत पालखी सोहळा विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसेल तर पालखी सोहळा हा उरुळी कांचन मार्गी जाऊ देणार नाही, असा इशारा उरुळी कांचन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी दिला आहे.


लोणी काळभोर या ठिकाणी मुक्काम झाल्यास पालखी पुढे उरुळी कांचन येथे विसाव्यास थांबते. मात्र, प्रांत अधिकारी आणि सोहळा प्रमुखांनी पुढे यवत या गावी जाण्यासाठी पालखीस उशीर होतो. त्यामुळे विसाव्यास थांबता येणार नाही असे सांगितले आहे. पालखी ही परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात दुपारी पालखी विसाव्यास थांबवावी ही ग्रामस्थांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार आहोत. यावर तोडगा काढण्यासाठी तत्पूर्वी बुधवारी (ता. ३१) सर्व ग्रामपंचायत प्रशासन, विश्वस्त, ग्रामस्थ यांची ग्रामसभा होणार आहे.
- राजेंद्र कांचन, सरपंच, उरुळी कांचन (ता. हवेली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com