रामोशी समाजासाठी ५० कोटींची तरतूद

रामोशी समाजासाठी ५० कोटींची तरतूद

वडगाव निंबाळकर, ता. १२ : रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली. या निर्णयाचे स्वागत वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे रामोशी समाजाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवून उत्साहात केले.
शासनाने दुर्लक्षित असलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी केलेले महामंडळ समाजातील गरीब कुटुंबांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सरकाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी येथील माळी वस्ती होळ चौकात रामोशी समाजाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्र भंडलकर, अलकाताई भंडलकर, ऊर्मिला मदने, पांडुरंग घळगे, अर्जुन खोमणे, बाळासाहेब खोमणे, नंदकुमार जाधव, सोनू खोमणे, अप्पा भंडलकर, बापूराव भंडलकर, मेजर दिलीप ठोंबरे, सतीश साळवे, चेतन साळवे, बाबूराव चव्हाण, साक्षी भंडलकर, पप्पू भंडलकर, बाबू चव्हाण, वसंत आगम, राजू शिंदे, विशाल साळवे, आदित्य चव्हाण उपस्थित होते.

01797

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com