थोपटेवाडीत जनावरांचा टेम्पो पकडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोपटेवाडीत जनावरांचा टेम्पो पकडला
थोपटेवाडीत जनावरांचा टेम्पो पकडला

थोपटेवाडीत जनावरांचा टेम्पो पकडला

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १६ : कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेंम्पो थोपटेवाडी (ता. बारामती) येथे स्थानिक तरुणांनी बुधवारी (ता. १५) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
याबाबत पोलिसांनी उत्तम आनंदराव चव्हाण (रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती), मुख्तार कुरेशी (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन खिलार गाई, एक बैल यासह टेंम्पो, असा ५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. थोपटेवाडी-लाटे रस्त्यावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर टेम्पोमधून (क्र. एम.एच. ४२ ए.क्यू १११४) १ लाख ३५ हजार रुपये किमतीची गोवंश जातीची ३ जनावरे कत्तली करण्याचे उद्देशाने वाहतूक करताना मिळून आली.