वडगावात पारायण सोहळ्याने रंगत

वडगावात पारायण सोहळ्याने रंगत

वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे राम जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावने साजरा करण्यात आला. येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये लोकसहभागातून गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. सप्ताह दरम्यान भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम झाले. आळंदी येथील गणेश महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण सोहळ्याने कार्यक्रमात रंगत आणली. शिवलिंग गुरुलिंग स्वामी नाशिक यांचे राम जन्मानिमित्त कीर्तन पार पडले. महिलांनी पाळणा गायन करून राम जन्माचे स्वागत केले. येथील विष्णू पंचायतन मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा झाला. पाळणा गायन, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.

01818

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com