पर्यायी रस्ता न देता पुलाचे काम सुरू

पर्यायी रस्ता न देता पुलाचे काम सुरू

वडगाव निंबाळकर, ता. २२ ः वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द मार्गावर खोमणे वस्ती येथे चारीवर पुलाचे काम सुरू आहे. काम सुरू होण्यापूर्वी पर्यायी रस्ता तयार केला नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
वडगाव निंबाळकर गावठाण भागातून जात असलेल्या ओढ्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी येते. यामध्ये खोमणे वस्ती परिसरातून आलेल्या चारीतून ओढ्याला पाणी मिळते. यामुळे कोऱ्हाळे खुर्दकडे जाणारा मार्ग बंद होतो. ग्रामस्थांच्या मागणीवरून या मार्गावरील चारी वर पूल बांधण्याचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. परंतु, कामापूर्वी पर्यायी रस्ता काढला गेला नाही. यामुळे कोऱ्हाळे खुर्द ते वडगाव या मार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद आहे. पुलाच्या कामाला लागणारा वेळ पाहता सुमारे दोन महिने तरी हा मार्ग बंद राहील, असे चित्र आहे.
गावठाण लगत असलेल्या या पुलाच्या कामामुळे पलीकडच्या भागात असलेले रहिवासी आणि शेतकरी यांना आपला माल गावात आणण्यासाठी सुमारे चार किलोमीटर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. यातून मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी माहिती दर्शक फलक लावला गेला नाही. यामुळे कोणत्या योजनेतून आणि किती रकमेचे काम आहे याबाबतची माहिती मिळत नाही. पर्यायी रस्त्याबाबत कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पावसाच्या पाण्यामुळे काही काळ बंद पडणारा रस्ता आता पुलाच्या कामामुळे बंद आहे. यावरती नियंत्रण असणाऱ्या सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पर्यायी मार्ग तयार करावा कामाचा फलक लावला जावा, अशी मागणी होत आहे
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पर्यायी मार्ग काढण्यासाठी बाजूला जागा नसल्याचे सांगण्यात आले. पुलासाठी सुमारे ४५ लाख रुपये मंजूर आहेत. कामाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून ठेकेदाराला योग्य त्या सूचना दिल्या जातील असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com