वडगाव परिसरात वीजपुरवठा खंडित

वडगाव परिसरात वीजपुरवठा खंडित

वडगाव निंबाळकर, ता. १८ : वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, पणदरे परिसरात (ता. बारामती) वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नीरा-बारामती मार्गावर कटीन पुलानजीक रस्त्याच्या कडेचे झाड पडल्याने काही वेळ वाहतूक थांबली. वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बुधवारी (ता. १७) सायंकाळी सातच्या दरम्यान कोसळल्या.
पहिल्याच पावसाच्या शिरकाव्याने काही काळ थंडावा निर्माण केला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. पहिलाच पाऊस असल्याने माती भिजून मातीचा सुगंध दरवळला. वादळी वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिसरात ऊस पीक असल्याने पावसाच्या सरींचा फारसा परिणाम होणार नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
हैरान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com