वेल्हे तालुक्याच्या पश्चिम भागाला तडाखा

वेल्हे तालुक्याच्या पश्चिम भागाला तडाखा

वेल्हे, ता. ७ : वेल्हे तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी (ता.७) पहाटे तीन व दुपारी चारच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाने झोडपले. आंब्याच्या कैऱ्यासह कापणीस आलेल्या गहू, हरभरा तसेच वाटाणा आदी पिकांना मोठा तडाखा बसला. अद्यापही येत्या पाच सहा दिवस वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विंझर, पाबे, दापोडे, वेल्हे, तसेच पानशेत, निगडे मोसे, ओसाडे परिसरात पावसाने अर्धा पाऊण तास धुमाकूळ घातला. तर खामगाव मावळ, मोरवाडी भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला. वादळीवाऱ्यासह आसपासच्या मांगदरी, आंबवणेसह तोरणा वेल्हा काल (ता.६) होळीच्या दिवशी आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.
दरम्यान, लागोपाठच्या पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी केलेल्या शेतातील पिकेही घरात आणता आली नाही. महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून, तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वेल्हे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांनी केली आहे.
वेल्हे येथील माजी सरपंच संतोष मोरे म्हणाले, कापणीस आलेल्या वाटाणा,गहू आदी पिके आडवी पडली आहेत. पिके जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com