वेल्हे तालुक्याचे नामकरण 
राजगड करण्याची मागणी

वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्याची मागणी

वेल्हे, ता. २७ : वेल्हे तालुक्याचे नामकरण ‘राजगड तालुका’ असे करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले आहे.
सरकारला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे राज्य कारभार चालवला आहे. त्यामुळे या किल्ल्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे वेल्हे तालुक्याचे नामकरण हे राजगड असे करावे, अशी जनतेची तीव्र इच्छा आहे. याबाबत तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही तसा ठराव केलेला आहे.
वेल्हे तालुका हा शिवकालीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला तसेच स्वराज्यात महत्त्वाचे ठरलेले राजगड आणि तोरणा, हे दोन किल्ले असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्तऐवज पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापि या तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बुद्रुक, घेरा येथे असून तालुक्याचे नाव वेल्हे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोक भावनेचा विचार करत मावळा जवान संघटनेच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये ग्रामपंचायतींचे राजगड नामकरणासाठी ठराव घेण्यात आले होते.

जगातील पहिले लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्र ज्या भूमीत छत्रपती शिवरायांनी निर्माण केले, त्या दुर्गदुर्गेश्वर राजगडाच्या नावाने दुर्गम अशा वेल्हे तालुक्यास ओळख निर्माण होऊन स्वराज्याच्या पाऊल खुणा पुन्हा जिवंत होणार
- ॲड. उल्हास दारवटकर

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक ६ जून रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यासाठी शासन व राज्यकर्त्यांना तसेच जनतेला मोठी संधी निर्माण होणार आहे
- डॉ. जितेंद्र जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com