वाहतूक नियंत्रकाच्या प्रतीक्षेत वेल्हे बसस्थानक

वाहतूक नियंत्रकाच्या प्रतीक्षेत वेल्हे बसस्थानक

वेल्हे, ता. २८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले अशा ऐतिहासिक भूमीमध्ये व तालुक्यातील एकमेव वेल्हे गावी असलेल्या बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली असून परिसर अस्वच्छता, पाण्याअभावी स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी, स्थानकात मद्यपी, जुगार खेळणाऱ्यांचा अड्डा अशा एक ना अनेक समस्यांसह बसस्थानकाला वाहतूक नियंत्रकाचीच प्रतीक्षा असल्याने दुर्गम डोंगरदऱ्यातील एसटी बस सेवा पूर्णपणे कोडमल्याचे चित्र दिसत आहे.

राजगड तालुक्यामध्ये एकमेव बसस्थानक हे वेल्हे गावात आहे. वेल्ह्याचे बसस्थानक स्वारगेट पुणे यांच्या नियंत्रणात असले तरीसुद्धा पुणे विभाग नियंत्रक यांच्या आदेशानुसार भोर एसटी आगारामधील कर्मचाऱ्यांची या ठिकाणी वाहतूक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान वाहतूक नियंत्रक उपस्थित असणे किंवा आठवड्यातील दोनच दिवस वाहतूक नियंत्रक या ठिकाणी हजर राहत असून या दोन दिवसांमध्ये सकाळी अकरा साडे अकरा वाजता भोर वरून येणे व दुपारी साडेतीन-चार च्या दरम्यान निघून जाण्याच्या घटना समोर आल्याने बसस्थानकावर असलेल्या प्रवाशांना एसटीच्या वेळा न कळणे तसेच एसटी सेवा रद्द होणे अशा घटना वारंवार घडत आहेत.

यामुळे तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या सेवे अभावी दुर्गम भागातील नागरिकांना तसेच महिलांना व विद्यार्थ्यांनीना खासगी वाहनाने धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे दुर्गम भागातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तालुक्यातील अठरा गाव मावळ परिसरामध्ये केळद, कुंबळे, पासली, हारपुड, सिंगापूर एकलगाव, शेनवड, बालवड कोलंबी, भोर्डी, नाळवट या परिसरातील तसेच गुंजवणी धरणाच्या तीरावर असलेल्या अंत्रोली, घिसर, निवी, तसेच राजगड पायथ्याशी असलेल्या वाजेघर, मेटपिलावरे, भोसलेवाडी, पाल बुद्रूक, गुंजवणे, चिरमोडी, भूतोंडे, चांदवणे या भागातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वारगेट आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

दृष्टिक्षेपात स्थानक
वाहतूक नियंत्रकाचीच प्रतीक्षा.
बस स्थानकामध्ये पाण्याअभावी स्वच्छता गृहांमध्ये दुर्गंधी.
रात्रीच्या वेळी असलेला अंधार.
वेळेचे चुकीचे नियोजन.
बसस्थानकात मुक्कामी एसटी नाही.
दुर्गम भागातील अनेक मुक्कामी एसटी सेवा बंद.


वेल्हे तालुक्यातून शेकडो कामगार विद्यार्थी व व्यावसायिक कामानिमित्त पुणे शहराकडे जात असतात परंतु वेळेत एसटीची सेवा न मिळाल्याने अनेकांचे मोठे नुकसान होते. एसटीच्या सेवेमध्ये सुधारणा होत नसल्याने वेल्ह्यापर्यंत पीएमपीएलची सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-संतोष मोरे, माजी सरपंच, वेल्हे


दुर्गम भागातील नागरिकांना एसटी सेवेची मोठ्या प्रमाणात गरज असताना सुद्धा या परिसरातील मुक्कामी गाड्यांची सेवा बंद केल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .
रमेश शिंदे, माजी सरपंच. केळद ग्रुप ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com