आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन भेट
आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन भेट

आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन भेट

sakal_logo
By

वाल्हे, ता. ९ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बुधवारी (ता. ८) हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून शिवदिग्विजय प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून आणि कलश महिला बचत गटाच्या सहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन भेट देण्यात आले. या उपक्रमाचे महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
याप्रसंगी माजी सरपंच महादेव चव्हाण, सुशांत पवार, देविदास भोसले, भगवान भुजबळ, शीतल पवार, स्वप्नाली देशपांडे, आतिष जगताप, पूर्वा राऊत, स्वाती गायकवाड, डॉ. तेजस्विनी पवार, मनीषा पवार, गौरी रणधीर, प्राची जाधव, वैशाली दानवले, नम्रता लव्हाळे, सुप्रिया तांबे, तानाजी मेटकरी उपस्थित होते.
सॅनिटरी पॅडचा वापर आजही अर्ध्याहून अधिक महिला करत नाहीत. अनेकांना हा खर्च परवडत नाही किंवा बहुतांश ठिकाणी ही सोय उपलब्ध नसते. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे हे पॅड महिलांना मिळावेत यासाठी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन सुरू केले असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आशा स्वयंसेविका रोहिणी पवार यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी पवार यांनी तर आभार संजीवनी दरे यांनी मानले.