पीक कर्जाच्या व्याजापासून शेतकरी वंचित

पीक कर्जाच्या व्याजापासून शेतकरी वंचित

खळद, ता. १ : जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार देत असल्याने शेतकऱ्यांना हे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळते. मात्र, गेले दोन वर्षापासून शेतकऱ्यांना ही व्याजाची रक्कम परत मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त होऊन केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने व्याजाची रक्कम अदा करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
पूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तात्पुरत्या स्वरूपात व्याजाचा भार सोसत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देत होती व या पोटी असणारे ६ टक्के व्याज हे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून बँकेला नंतर मिळत असे. परंतु केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी आपले धोरण बदलून व्याजाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट देण्याचा निर्णय घेतल्याने बँकेला सदर व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना देता येत नाही. मात्र, या निर्णयामुळे गेले दोन वर्षापासून शेतकरी पीक कर्जाची परतफेड ही सहा टक्के व्याजदराने करत आहेत व अद्याप पर्यंत हे ०६% टक्के व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावरत शासनाच्या कडून जमा झाले नाही. तर यावर्षी परतावा केल्यानंतर तिसऱ्या वर्षाचे ही व्याज शेतकऱ्यांना मिळणे बाकी राहील.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी केंद्र सरकार ३% व राज्य सरकार ३% याप्रमाणे शेतकऱ्यांना सहा टक्के दराने व्याजाची रक्कम परत मिळेल यासाठी बँकेच्या वतीने याद्या पाठवण्याचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगितले, मात्र ही रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल याबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे.

गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या व्याजाबाबत बँकेकडून शासनाकडे पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा सुरू आहे तर याबाबत आमदार साहेबांनीही विधिमंडळात पाठपुरावा केला आहे लवकरच हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील.
- प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

विकास सोसायट्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देतात. यामध्ये केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करत सदर व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना थेट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेले दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत मिळाली नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत असून भविष्यात शेतकऱ्यांनी या कर्जाकडे पाठ फिरवली तर सहकारी सोसायट्या अडचणीत येतील.याचा विचार करून शासनाने तातडीने शेतकऱ्यांचे व्याजाचे पैसे अदा करावेत.
- चंद्रकांत कामथे, अध्यक्ष, खळद विविध कार्यकारी सेवा सोसायटी.

01273

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com