मांडकीतील आखाड्यात रंगल्या ५५ मल्लांच्या लढती

मांडकीतील आखाड्यात रंगल्या ५५ मल्लांच्या लढती

वाल्हे, ता.१५ : मांडकी (ता.पुरंदर) येथे श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यात्रेनिमित्त शनिवारी (ता. १५) कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन केले होते. यावेळी आखाड्यामध्ये जवळपास ५५ मल्लांच्या लढती रंगल्या.
कुस्ती आखाड्याचे उद्‌घाटन आबा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्ती स्पर्धेला परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान कुस्त्यांचा आखाडा झाला. कुस्तीसाठी आखाड्यामध्ये शंभर रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत इनाम वाटप करण्यात आले. यामध्ये महिलांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. आखाडा यशस्वी करण्यासाठी सोमेश्वरचे माजी संचालक मोहन जगताप, माजी उपसरपंच विश्वास जगताप, संजीवन जगताप, विजय साळुंखे, प्रवीण जगताप, सतीश जगताप, राहुल शिंदे, छगन जगताप, चेतन जगताप, माणिक जगताप, विनोद झेंडे आदींनी परिश्रम घेतले.
शिवाजी साळुंखे, राजेंद्र जगताप, योगेश झेंडे, विकास जगताप आदींनी पंच म्हणन काम पाहिले. वाल्हे पोलिस ठाण्यातील केशव जगताप, मंगेश घोगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
...
01348

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com