वाल्हे येथे मुलींच्या कुस्त्या ठरल्या लक्षवेधी

वाल्हे येथे मुलींच्या कुस्त्या ठरल्या लक्षवेधी

वाल्हे, ता. १७ : वाल्हे (ता.पुरंदर) येथे श्रीभैरवनाथ यात्रेनिमित्त रविवारी (ता. १६) जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. यावेळी पुरंदर केसरी विजेत्यांसह मुलींच्या कुस्त्या लक्षवेधक ठरल्या. आखाड्यात शेकडो मल्लांची हजेरी लावली.
कुस्ती आखाड्याचे उदघाटन साहेबराव पवार व शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्ती स्पर्धेला परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. कुस्तीसाठी महिला कुस्तीगीर यांच्यासह सासवड, बारामती, फलटण, गराडे, भोंगवली, खंडाळा, सोमेश्वर, मुरूम, पिसर्वे, रावडी, शिवरी, पांगारे, पिंपरी आदी ठिकाणच्या मल्लांनी आखाड्यात निकाली कुस्त्या सादर केल्या.
दरम्यान, पावसाचे वातावरण यामुळे काहीकाळ आखाड्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अंधारमय झाल्याने कमिटीला मोबाईलच्या उजेडामध्ये अंतिम पुरंदर केसरी विजेत्यांची कुस्ती घ्यावी लागली. आखाड्यामध्ये पन्नास रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीसे विजेत्या पहिलवानांना देण्यात आली. आखाडा यशस्वी होण्यासाठी माजी सभापती गिरीश पवार, सचिव शशिकांत दाते, हनुमंत पवार, प्रताप पवार, सतीश पवार यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, सरपंच अमोल खवले, गोरख कदम, राहुल यादव, प्रा.संतोष नवले, विक्रम पवार, प्रवीण कुमठेकर, प्रदीप चव्हाण, नारायण पवार आदींसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रेय पवार, पुंडलिक भुजबळ, डी.डी.पवार, अरुण पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले. वाल्हे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार केशव जगताप, प्रशांत पवार, मंगेश घोगरे यांनी बंदोबस्त ठेवला होता. हनुमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार यांनी आभार मानले.


01356

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com