पिसुर्टीसह परिसरातील शेतकरी सुखावला

पिसुर्टीसह परिसरातील शेतकरी सुखावला

वाल्हे, ता.६ : गेल्या महिन्याभरापासून उन्हाचा पारा खूप वाढत असल्याने उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होत होता. परंतु अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सलग दुसऱ्या दिवशी पुरंदर तालुक्यातील पिसुर्टीसह जेऊर मांडकी परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अचानक दमदार हजेरी लावल्याने दुष्काळाने हैराण झालेला बळिराजा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असताना या पावसाने सुखावला असल्याची प्रतिक्रिया युवा शेतकरी राहुल भुजबळ व अतुल बरकडे यांनी व्यक्त केली.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी वर्ग पूर्व मशागतीची कामे उरकत असताना सर्वत्र दमदार पावसाची गरज होती. दरम्यान गेले दोन
दिवस पिसुर्टीसह जेऊर मांडकी व कामठवाडी परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या पावसाने सुरवात केल्याने यावर्षी पावसाळा चांगला होईल व पावसाच्या पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवे�्या नेत्यांनी त्यांच्या गावात सुळे यांना मताधिक्य मिळवण्यात यश मिळवले आहे. आमदार थोपटे यांच्या हातनोशी गावात पवार यांना फक्त ४९; तर सुळे यांना ४३४ मते मिळाली. शिवसेनेचे (ठाकरे) तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांच्या शिंदेवाडी गावात सुनेत्रा पवार यांना ४१२; तर सुळे यांना ६९८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल यांच्या महुडे बुद्रुक येथे पवार यांना १८७; तर सुळे यांना ८१३ मते मिळाली. सुळे यांचे प्रचारप्रमुख मानसिंग धुमाळ यांच्या पसुरे गावाच पवार यांना १३६; तर सुळे यांना ३२० मते मिळाली. गणेश खुटवड यांच्या उंबरे येथे पवार यांना १५६; तर सुळे यांना ४९५ मते मिळाली आहेत.
वेळू येथे पवार यांना ६१९; तर सुळे यांना १२३७, शिवरे येथे पवार यांना २००; तर सुळे यांना ८६५, कुरुंगवडी येथे पवार यांना २४७; तर सुळे यांना ४३२, नसरापूर येथे पवार यांना ६२६; तर सुळे यांना ९६९, भोंगवली येथे पवार यांना ५५७; तर सुळे यांना ९७८ मते मिळाली आहेत. बहुतेक सर्वच गावात सुळे यांनी मताधिक्य घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com