सुप्रिया सुळेंनी वाल्हेत घेतले माउलींचे दर्शन

सुप्रिया सुळेंनी वाल्हेत घेतले माउलींचे दर्शन

Published on

वाल्हे, ता. ६ : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. ५) रात्री उशिरा पालखी तळावर जाऊन माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी सुळे यांनी पावसासाठी माउलींना साकडे घातले. याप्रसंगी त्यांनी वारकऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वारकऱ्यांची त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी झुंबड उडाली होती.
टाळ-मृदंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात शुक्रवारी दुपारी आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकींच्या तपोभूमी वाल्हेनगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विसावला.
पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी रात्री उशिरा पालखीतळावर जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांवर माथा टेकवून दर्शन घेतले. यावेळी माजी सभापती दत्ता चव्हाण, हनुमंत पवार, ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, संभाजी पवार, धनंजय भुजबळ, मनोज भुजबळ, प्रीतम डहाळे, साईनाथ चव्हाण, अजय कुदळे, रवींद्र लंबाते, गंधर्व शहा, सुधीर पवार, निखिल पवार उपस्थित होते.
सुळे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन सर्व परिसर जलमय होऊन शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येवोत आणि त्यांच्या शेतमालाला बाजार मिळावा, दुधाला बाजारभाव मिळावा अशी प्रार्थना माउलींच्या चरणी केली. यावेळी देवस्थानच्या वतीने सुळे यांचा सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.