यवतमध्ये रुग्णालयात ''सुंदर दवाखाना'' अभियान

यवतमध्ये रुग्णालयात ''सुंदर दवाखाना'' अभियान

यवत, ता.२३ः यवत (ता. दौंड) येथील ग्रामीण रुग्णालयात ''सुंदर माझा दवाखाना'' अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी उत्तम आरोग्य सुविधा, परिसराची स्वच्छता, इमारतीची रंगरंगोटी अशा विविध कामांची सध्या लगबग सुरू आहे, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बाळासाहेब कदम यांनी सांगितले.
रुग्णालयात दररोज दीडशेहून अधिक बाह्यरुग्ण व वीस ते पंचवीस आंतररुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. येथे मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर रुग्णांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. रुग्णालयात रक्त तपासणी, एक्सरे, अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, समुपदेशन अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. आंतररुग्णांसाठी सुमारे २० खाटांचा पुरुष कक्ष व २० खाटांचा महिला कक्ष उपलब्ध आहे. प्रशस्त इमारतीमध्ये हे रूग्णालय आहे. डॉ. बाळासाहेब कदम यांची काही दिवसांपूर्वीच आरोग्य अधीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. उपलब्ध साहित्य व सहकाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रुग्णालयात यापूर्वी प्रसूती शस्त्रक्रिया बंद होत्या त्यांनी आपल्या कार्यकालात या सुरू केल्या आहेत.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयासाठी पुरेसा अधिकारी व सेवक वर्ग उपलब्ध व्हावा. तसेच एका स्त्रीरोग तज्ज्ञाची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले. सध्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी खासगी स्त्रीरोग तज्ज्ञास बोलवावे लागत आहे.


माझी हृदय शस्त्रक्रिया (एंजोप्लास्टी) झालेली आहे. ग्रामीण रुग्णालयात मी माझ्या विविध तपासण्या करून घेतल्या होत्या. त्याचा उपयोग मला माझा हृदय विकार समजण्यासाठी झाला. शस्त्रक्रियेनंतरही मी नियमितपणे येथेच तपासण्या करून घेत असतो. उपलब्ध असणारी औषधेही मला येथे मिळतात. जनतेने येथील सेवेचा लाभ घ्यावा.
-चांगदेव लवांडे, नागरिक, यवत
--------------------------------
00722

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com