मारुती सुझुकी सुपर कॅरीने पार केला १ लाखाचा टप्पा

पुणे, ता. १४ : मारुती सुझुकी सुपरकॅरी या देशाच्‍या सर्वात शक्तिशाली मिनी ट्रकने लाँच केल्‍यापासून पाच वर्षांत नुकताच एक लाख युनिट विक्रीचा लक्षणीय टप्‍पा गाठला आहे. ४-सिलिंडर इंजिन असलेला भारतातील एकमेव मिनीट्रक सुपरकॅरी कार्यक्षम गुड्स कॅरियरची गरज असलेल्‍या व्‍यावसायिक ग्राहकांच्‍या वैविध्‍यपूर्ण गरजांची पूर्तता करणारा आहे. पेट्रोल व सीएनजी पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असलेला मारुती सुझुकी सुपरकॅरी भारतीय मिनीट्रक ग्राहकांच्‍या गरजा लक्षात घेत खास भारतीयांसाठी विकसित करण्‍यात आल्याची माहिती मारुती सुझुकी इंडियाच्या वतीने देण्यात आली.

मारुती सुझुकीने २०१६ मध्‍ये भारतात सुपर कॅरीच्‍या सादरीकरणासह व्‍यावसायिक विभागात प्रवेश केला. अल्‍पावधीतच दर्जात्‍मक क्षमता, सर्वोत्तम मायलेज, सुलभ मेन्‍टेनन्‍स, आरामदायी व सुधारित स्टोअरेज क्षमता अशा वैशिष्‍ट्यांनी युक्‍त असणाऱ्या सुपरकॅरीचे ग्राहकांकडून कौतुक करण्‍यात आले. या वैशिष्‍ट्यांमुळे त्‍यांना अधिक लाभ मिळण्‍यामध्‍ये मदत होते. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्‍या विपणन व विक्री विभागाचे वरिष्‍ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्‍तव म्‍हणाले, ‘‘अल्पावधीतच, सुपरकॅरीला बाजारपेठेत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारार्हता मिळाली आहे. सुपरकॅरीच्या माध्यमातून आम्ही मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यात सक्षम झालो आहोत. सुपरकॅरीच्या एस-सीएनजी व्‍हेरिएं‍टने व्यवसायांना प्रतिकिलोग्रॅम २१.५५ किमी इतक्या सर्वोत्तम मायलेजसह नफा प्राप्‍त करून दिला आहे. ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.’’

मारूती सुझुकी सुपरकॅरी देशाचा पहिला ४-सिलिंडर शक्‍ती असलेला मिनीट्रक असून, यातून सुलभ पिकअपची खात्री मिळते. या मिनीट्रकमध्‍ये सुरक्षितता व आरामदायी वैशिष्‍ट्ये आहेत. भारतातील २३७ हून अधिक शहरांमधील मारुती सुझुकीच्‍या ३३५ हून अधिक कमर्शिअल आऊटलेट्समधून सुपरकॅरीची विक्री केली जाते. भारतात तीन हजार ८०० हून अधिक मारुती सुझुकी सर्व्हिस नेटवर्कचे पाठबळ आहे. सुपरकॅरीसह कमर्शिअल चॅनेल मारुती सुझुकी कार्सच्‍या ईईसीओ कार्गो व टूर रेंजचीही विक्री करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com