प्रभाग रचनेचे प्रारूप पुढील आठवड्यात

प्रभाग रचनेचे प्रारूप पुढील आठवड्यात

पुणे, ता. १६ : प्रारूप प्रभाग रचनेत राज्य निवडणूक आयोगाने काढलेले आक्षेप महापालिकेकडून दुरुस्त करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना महापालिकेने तयार करून राज्य निवडणूक आयोगाला ६ डिसेंबर रोजी सादर केली आहे. दरम्यान आयोगाने या प्रारूप प्रभाग रचनेत २४ हून अधिक त्रुटी काढत आक्षेप घेतले होते. ते दुरुस्त करून देण्याच्या सूचना महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयोगाच्या उपस्थितीत दुरुस्ती करून दिली आहे. काही दुरुस्त्या आयोगाकडून परस्पर करण्यात आल्या. त्यामुळे प्रभाग रचनेचे प्रारूप अंतिम होण्याच्या टप्प्यावर असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील आठवड्यात ही प्रारूप प्रभाग रचना हरकती-सुनावणीसाठी प्रसिद्ध होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका नेत्याच्या हट्टापायी प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यात चुका झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. या नेत्याने मनासारखा प्रभाग करून घेतल्याने आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला. त्यातून न्यायालयीन वाद सुरू झाला आहे. त्यामुळे आयोगाने मान्यता दिल्यानंतर आणि प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या प्रभागाच्या हद्दी तशाच असल्याचे आढळून आले तर प्रभाग रचना न्यायालयीन वादात अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com