लसीकरण, वर्तनातील बदल हाच उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
लसीकरण, वर्तनातील बदल हाच उपाय

लसीकरण, वर्तनातील बदल हाच उपाय

पुणे - ओमिक्रॉनच्या (Omicron) प्रसाराचा दर जरी जास्त असला, तरी रुग्ण (Patient) अत्यवस्थ होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. मात्र, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि आजाराची गंभीरता लक्षात घेता, लसीकरण (Vaccination) व कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करत वर्तनात बदल करणे हाच शाश्‍वत उपाय आहे, असे मत शास्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यासह देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन या प्रकारातील विषाणूच्या प्रसाराचा दर वाढला आहे. लसीकरण आणि आधी होऊन गेलेल्या कोरोनामुळे या विषाणूच्या बाधेनंतरही रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्युचा दर कमी आहे.

रात्रीची संचारबंदी किंवा ताळेबंदी हा सध्यासाठी शास्रीय उपाय नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लोकांनी स्वयंशिस्तीने पुढील काही दिवस तरी नियमांचे पालन करत रोजचे व्यवहार करणे गरजेचे आहे.

ओमिक्रॉनबद्दल हे समजून घ्या...

 • कोरोना विषाणूंच्या जमातीतीलच एक प्रकार

 • प्रसाराचा दर सर्वाधिक, परंतु डेल्टा प्लस इतका घातक नाही

 • लसीकरणामुळे ओमिक्रॉन विरुद्धही संरक्षण मिळते हे निर्विवाद

 • दुर्धर किंवा सहआजार असलेल्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

 • लस घेतली तरी बाधा होईल, मात्र अत्यवस्थ होण्याची शक्यता कमी

आपण हे करू शकतो...

 • लशीचे दोन्ही डोस तातडीने पूर्ण करा

 • मास्क लावणे, गर्दी टाळणे, अनावश्यक फिरणे बंद करावे

 • लक्षणे दिसल्यास तातडीने निदान करा

 • घरात राहून कोरोना बरा होतो, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या

 • अनावश्यक रुग्णालयात दाखल होणे टाळा

हेही वाचा: पुण्यात रविवारी ५२४ नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यात ८५० रुग्ण तर दोघांचा मृत्यू

किशोर व युवावर्गाने घ्यावी काळजी

 • शाळा अथवा महाविद्यालयात कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करा

 • १५ ते १८ वर्गाचे लसीकरण पूर्ण व्हायला निश्चितच वेळ लागणार

 • कोरोनासंबंधीची लक्षण दिसल्यास तातडीने विलगीकरण आणि उपचार घ्या

 • १८ वर्षांपुढील सर्वांनी दोन्ही डोस नियमानुसार पूर्ण करा

मास्कबद्दल हे लक्षात घ्या..

जगभरातील नव्या माहितीनुसार ओमिक्रॉन विरुद्ध केवळ कापडी मास्क पुरेसे नाही. एन-९५ किंवा त्या समान चांगल्या दर्जाचे मास्क घालणे आवश्यक आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाच्या डॉ. आरती नगरकर यांनी सांगितले.

लसीकरणाचा फायदा होतो हे निश्चित आहे, त्यामुळे लशीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करू नका. कोरोनाचा कोणताही प्रकार आला, तरी लसीकरण आणि प्रसार रोखण्यासाठी आवश्यक वर्तन कायम ठेवणे गरजेचे आहे.

- डॉ. आरती नगरकर, शास्त्रज्ञ, आरोग्यशास्त्र विभाग, सा. फु. पुणे विद्यापीठ

ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी घाबरू नये. लसीकरणानंतर संसर्ग झाला, तरी तो सौम्य स्वरूपाचा असतो. मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे, गर्दी टाळणे, लसीकरण पूर्ण करणे हीच कोरोनाविरुद्धच्या लढाईची शाश्‍वत शस्त्रे आहेत.

- डॉ. योगेश शौचे, सूक्ष्मजीवशास्रज्ञ, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था, पुणे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top