गुंडाळवाडी, बुरसेवाडीत 
विकासकामांचे भूमिपूजन

गुंडाळवाडी, बुरसेवाडीत विकासकामांचे भूमिपूजन

चास, ता. ३ : ‘‘नागरिकांच्या समस्या जाणून घेत विविध विकासकामे केली जात आहेत. यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न सुटून विकास वेगाने होत आहे,’’ असे मत जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी व्यक्त केले.
गुंडाळवाडी व बुरसेवाडी (ता. खेड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी रविवारी त्या बोलत होत्या. बुरसेवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे, बिबी गुंडाळवाडी येथे अंगणवाडी बांधकाम करणे आणि ग्रामपंचायत १५व्या वित्त आयोगातून शंभो ठाकरवाडी रस्त्याच्या कामाचा यात समावेश आहे. सरपंच सुजाता भोर, उपसरपंच सतीश जैद, ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंडाळ, सदस्य फसाबाई चतुर, संगीता तनपुरे, सोनाबाई दोरे, मंगल मोसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाबूराव भोर यांनी केले, सूत्रसंचालन सुरेश जैद यांनी केले. मारुती राक्षे यांनी आभार मानले.

CHS०३ P२
2S32599

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com