IT Company
IT CompanySakal

पुणे, मुंबईमध्ये ‘आयटी’त मराठी टक्का कमीच!

देशात माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. देशातील एकूण आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मराठी भाषकांचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांचे आहे.
Summary

देशात माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. देशातील एकूण आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मराठी भाषकांचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांचे आहे.

पुणे - देशात माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात (IT Field) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची (Employee) संख्या लाखोंच्या घरात आहे. देशातील एकूण आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मराठी भाषकांचे (Marathi People) प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांचे आहे. तसेच पुणे आणि मुंबई या शहरात हे प्रमाण ३० ते ३५ टक्के पर्यंतच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

देशात सहा शहरांत मोठ्या आणि मध्यम स्वरूपाचे आयटी हब आहेत. यामध्ये ४५ लाखांहून अधिक कर्मचारी आयटी क्षेत्र व संबंधित सेवांमध्ये (सर्व्हिसेस) काम करतात. तसेच राज्यात मुंबई, पुणे हे दोन मोठे आयटी हब असून, यामध्ये इतर भाषक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मराठी भाषकांचे प्रमाण कमी आढळून येते. आयटी क्षेत्रात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असून, मराठी मुले याकडे आत्मविश्वासाच्या अभावामुळे मागे असल्याचे दिसून येत आहेत. शैक्षणिक पात्रता असूनही ते यापासून दूर आहेत. पुण्यात व मुंबईसह इतर शहरांमध्ये नोकरीच्या संधी सातत्याने निर्माण होत असतात, मात्र घराजवळच सर्वकाही हवे, अशा मानसिकतेमुळे मराठी मुलांकडून बरेचदा या संधींकडे दुर्लक्ष केले जाते. इच्छाशक्ती असेल तर आयटीमध्ये काम करून ऐटीत जगण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते, असे आयटी क्षेत्रातील मार्गदर्शक भूषण कदम यांनी सांगितले.

IT Company
महापालिकेच्या मुख्यसभेला आजारपणाने ग्रासले, महापौर पाॅझिटीव्ह

राज्यात पुणे आणि मुंबई या शहरात मराठी मुलांचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असल्याचे दिसून येते. बेंगळुरू आणि हैदराबाद वगळता इतर शहरात मराठी मुलांची संख्या कमीच आहे. आता कुठे या क्षेत्राबद्दल जागृकता होऊ लागली आहे. पारंपारिक नोकऱ्यांकडे आपल्या मुलांचे लक्ष अधिक आहे. तसेच राज्यात अधिक पसंती पुणे, मुंबई आणि आता नागपूरला दिली जाऊ लागली आहे. या पलीकडे मुलांची काम करण्याची इच्छा नसते, असे दिसून येते.

- राजेंद्र राऊत, अध्यक्ष एचआर एन लाइट फोरम

आयटी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे, मात्र तेवढ्या प्रमाणात मराठी मुलांची संख्या दिसून येत नाही. या करिअरमध्ये मोठ्या संधी आहेत. फक्त अधिक जनजागृतीची गरज आहे. धोका (रिस्क) पत्करण्याची तयारी असावी. आयटीबाबत आपेक्षित कौशल्ये आणि आत्मविश्वास कमी वाटतो.

- योगेश देशपांडे, एका आयटी कंपनीचे संचालक

ज्या कंपनीमध्ये काम करते, तेथे मराठी कर्मचाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढलेली दिसून येते. तर मोठ्या नामांकित कंपन्यांमध्‍ये अपेक्षा कमीच दिसून येते. असे असले तरी काही कंपन्यांमध्‍ये मराठी कर्मचाऱ्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्के असल्याचे दिसून येते.

- नेहा मोरे, आयटी कंपनीतील कर्मचारी

कंपन्या विविध शहरांमध्ये आहेत, मात्र याचे कॅम्पस चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, गुडगाव (दिल्ली) या शहरांमध्ये प्रामुख्याने आयोजित केले जातात. त्यामुळे त्या भागातील मुलांची संख्या अधिक दिसून येते. परिणामी मराठी मुलांचा टक्का कमी दिसून येतो.

- एका कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक

IT Company
रुग्ण संख्या कमी पण कोरोनाचा धोका कायम

मराठी मुलांचे प्रमाण कमी असण्याची कारणे

- संभाषण कौशल्यांचा अभाव

- इंग्रजी भाषेचा न्यूनगंड

- व्यक्तिमत्त्व विकसनाची कमतरता

- आयटीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात न करणे

- कौशल्य अवगत करण्याबाबतची उदासीनता

- स्थलांतर करण्याची इच्छा नसणे

- उपलब्ध संधींची माहिती नसणे

देशात या शहरांत आहेत मोठे आयटी हब

- बंगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई

मध्यम आयटी हब असणारी शहरे

- इंदूर, म्हैसूर, भुवनेश्वर, नागपूर, कोइमतूर, अहमदाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com