राष्ट्रीय युवा संसदेतर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय युवा संसदेतर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र
राष्ट्रीय युवा संसदेतर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र

राष्ट्रीय युवा संसदेतर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. ८ ः राष्ट्रीय युवा संसद संस्थेतर्फे (नॅशनल युथ पार्लियामेंट आर्गनायझेशन, एनवायपीओ) या संस्थेतर्फे १० आणि ११ जानेवारीला ‘बजेट डायलॉग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये केंद्र सरकारच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे.
युवा संसदेचा उद्देश भारतातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित आर्थिक धोरणे मांडण्याची संधी देणे व देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. चर्चासत्राचे उद्‍घाटन सोमवारी (ता. १०) राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या भाषणाने होणार आहे, तर मंगळवारी (ता. ११) युवा संसदेचे मंत्री आपले सादरीकरण करतील. गेल्या दोन वर्षात कोविडच्या परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असल्याने या वर्षीचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत, आयुष्यमान भारत, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, बॅंकिंग कोड, जीएसटी, जनधन आदी योजनांमुळे भारताची अर्थव्यवस्था मोठी झेप घेण्याच्या स्थितीत असून, देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या स्थिती आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top