‘सीईजीआर’च्या उपाध्यक्षपदी डॉ. चोरडिया यांची फेरनियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीईजीआर’च्या उपाध्यक्षपदी
डॉ. चोरडिया यांची फेरनियुक्ती
‘सीईजीआर’च्या उपाध्यक्षपदी डॉ. चोरडिया यांची फेरनियुक्ती

‘सीईजीआर’च्या उपाध्यक्षपदी डॉ. चोरडिया यांची फेरनियुक्ती

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांची नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्चच्या (सीईजीआर) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. सीईजीआरच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिएशनचे अध्यक्ष प्रा. के. के. अगरवाल व शोबित विद्यापीठाचे कुलपती कुंवर शेखर विजेंद्र यांच्या उपस्थितीत डॉ. चोरडिया यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.

‘सीईजीआर’ ही संस्था देशातील शिक्षण क्षेत्रासाठी कार्यरत असलेला नामांकित विचारगट आहे. शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी शिक्षणतज्ज्ञ, माध्यमे आणि धोरणकर्ते यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यासोबतच संशोधन आणि इनोव्हेशनच्या साहाय्याने व्यापक शिक्षणवृद्धीचा प्रयत्न याद्वारे केला जातो. ‘सीईजीआर’मध्ये १० हजारांपेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, संशोधक यांचा समावेश आहे. २०२२ या वर्षाकरिता ‘सीईजीआर’ची नॅशनल कोअर कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात डॉ. चोरडिया यांची नियुक्ती केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top